मुंबई - अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. लव रंजन दिग्दर्शन करीत असलेल्या चित्रपटात तिची जोडी रोमान्स स्टार रणबीर कपूरसोबत जमणार आहे. यासाठी तिचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
अद्याप चित्रपटाचे शीर्षक गुलदस्त्यात आहे. लव रंजन, रणबीर सिंग आणि श्रध्दा कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
''मी लव रंजन याच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूरसोबत काम करणार आहे. प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की स्वीटी हे लव रंजनचे चित्रपट माझ्या आवडीचे आहेत. मी रणबीरसोबत काम करण्यासाठी उत्साहात आहे. तो आमच्या काळातील एक सर्वोत्तम अभिनेता आहे. मला त्याचे काम आवडते. आतापर्यंत रणबीरसोबत मला कुणीही ऑफर दिली नव्हती, त्यामुळे या चित्रपटाकडे मी डोळे लावून बसली आहे.'',असे श्रध्दाने म्हटलंय.
या चित्रपटाचे शूटींग मार्च महिण्यात सुरू होणार आहे. 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' सिनेमाच्या रिलीजनंतर श्रध्दा या नव्या चित्रपटाची तयारी सुरू करेल.
श्रद्धा कपूरचा 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हा चित्रपट २४ जानेवारीला रिलीज होतोय. यात वरुण धवनच्या अपोझिट ती काम करीत आहे. रेमो डिसुझाने याचे दिग्दर्शन केलंय.