ETV Bharat / sitara

कंगनासमोर हृतिकची पुन्हा माघार, 'सुपर ३०'ची रिलीज डेट बदलली - mental hai kya

या अडथळ्यांचे मूळ कारण आहे कंगना. हृतिकचा 'सुपर ३०' चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, कंगनानेदेखील 'मणिकर्णिका'च्या प्रदर्शनाची तारीख हीच ठरवली. ज्यानंतर हृतिकने माघार घेत आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली.

'सुपर ३०'ची रिलीज डेट बदलली
author img

By

Published : May 10, 2019, 8:32 AM IST

मुंबई - कंगना रनौत आणि हृतिक रोशनचा वाद सर्वांनाच माहिती आहे. मात्र, या वादात हृतिकने अनेकदा कंगनासमोर माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. अशातच हृतिकचा 'सुपर ३०' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र, चित्रपटाच्या मार्गात सतत कोणते ना कोणते अडथळे येत आहेत.

या अडथळ्यांचे मूळ कारण आहे कंगना. हृतिकचा 'सुपर ३०' चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, कंगनानेदेखील 'मणिकर्णिका'च्या प्रदर्शनाची तारीख हीच ठरवली. ज्यानंतर हृतिकने माघार घेत आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली.

यानंतर नुकतंच हृतिकचा 'सुपर ३०' चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित केला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं. तर यामागोमागच कंगनानेही आपल्या 'मेंटल हैं क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २६ जुलै जाहीर केली. ज्यानंतर आता हृतिकने पुन्हा एकदा कंगनासोबत टक्कर घेणं टाळत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले आहे. प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.