नवी दिल्ली - बॉलीवूड स्टार मनोज वाजपेयी हे कोरोनाच्या काळातील संचारबंदीदरम्यान कुटुंबियांसह उत्तराखंड येथील डोंगराळ भागात निसर्गाच्या सानिध्यात आहेत. कोरोना संसर्गाबाबत ते योग्य ती काळजी घेत असून बाहेर घडणाऱ्या घटनांपासून सुरक्षित असल्याचे त्याने सांगितले. हा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून निसर्गाच्या चक्रातून कोणीच सुटले नाही असे तो म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मनोज वाजपेयी हा दिपक डोबरियाल याच्या एका आगामी बेव सीरिजच्या शुटिंगनिमित्त उत्तराखंड येथे आला होता. मात्र, कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आणि तो त्याच्या कुटुंबियांबरोबर तेथेच अडकून पडला. मी लॉकडाऊनमुळए माझ्या कुटुंबियांसोबत या डोंगरात अडकून पडलो आहे. मात्र, येथे राहणे हे देखील तितकेच सुखद आहे. सध्या बाहेर घडणाऱ्या घटनांपासून मी सुरक्षित असून येथील स्थानिक नागरिकही खूप सजग आणि जागरुक असल्याचे तो म्हणला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कोरोना संसर्गाबाबत व्यक्त होताना मनोज म्हणाला, जीवन हे अनिश्चित आहे, हे याचा अनुभव मला इथे आल्यानंतर होत आहे. सध्याच्या परिस्थितीत श्रीमंत, गरीब, गरजु सर्वच या महामारीचा सामना करत असून सर्वांपुढे एक आणि सारखेच संकट येऊन ठाकले आहे. सृष्टी ही फार सुंदर आहे. मात्र, आपण तिच्या जास्त लोभात पडून जर गैरवापर करण्यास सुरुवात केली तर ती तिचे क्रूर रुप दाखवण्यासही मागे हटाणार नाही. निसर्गाची छेड काढणाऱ्या कुणालाही निसर्गाने सोडले नाही. त्यामुळे निसर्गाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे तो म्हणाला.
मनोज वाजपेयी नुकताच नेटफ्लीक्सवरील एका सीरियल किलर बेव सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास आला आहे. या सीरिजचे दिग्दर्शन शिरीश कुंदर यानी केले असून १ मे ला नेटफ्लीक्सवर 'मिसेस सीरियल किलर' प्रदर्शित करण्यात आली. यात जॅकलिन फर्नांडिस, मोहित रैना आणि मनोज वाजपेयी मुख्य भुमिकेत आहेत. हा क्राइम थ्रिलर ड्रामा असून त्यातील कहाणी एका महिलेभोवती फिरते जिच्या नवऱ्याला सीरियल किलिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात येते. ती आपल्या नवऱ्याला सोडवण्यासाठी काय करते यावर ही कहाणी फिरते. यासोबतच मनोज वाजपेयी अभिनीत 'फॅमिली मॅन' या बेव सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. लवकरच या सीरिजचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.