ETV Bharat / sitara

ठरल्या तारखेलाच RRR होणार रिलीज, राजामौली निर्णयावर ठाम - आरआरआर चित्रपटाची स्टारकास्ट

एसएस राजामौली यांनी त्यांच्या मेगा-बजेट आगामी पॅन इंडिया चित्रपट 'RRR' बाबत मोठी जोखीम घेतली आहे. कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा देशातील सिनेमागृहे बंद होणार आहेत. याबाबत दिग्दर्शक राजामौलीने स्पष्टपणे सांगितले आहे की, 'RRR' हा चित्रपट कोरोना व्हायरसच्या काळात त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रदर्शित

ठरल्या तारखेलाच RRR होणार रिलीज
ठरल्या तारखेलाच RRR होणार रिलीज
author img

By

Published : Dec 30, 2021, 7:32 PM IST

हैदराबाद - जगभरात वेगाने पसरत असलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एसएस राजामौली यांनी त्यांच्या मेगा-बजेट आगामी पॅन इंडिया चित्रपट 'RRR' बाबत मोठी जोखीम घेतली आहे. कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा देशातील सिनेमागृहे बंद होणार आहेत. याबाबत दिग्दर्शक राजामौलीने स्पष्टपणे सांगितले आहे की, 'RRR' हा चित्रपट कोरोना व्हायरसच्या काळात त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रदर्शित होणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर दिग्दर्शक एसएस राजामौलीसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर करत तरण आदर्शने लिहिले की, 'RRR' चित्रपटाची रिलीज डेट पुढे जाणार नाही. हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्याने स्वतः पुष्टी केली आहे की हा बिग बजेट चित्रपट नियोजित तारखेला पडद्यावर येईल."

ठरल्या तारखेलाच RRR होणार रिलीज
ठरल्या तारखेलाच RRR होणार रिलीज

एसएस राजामौली यांनी कोरोना विषाणूमुळे चित्रपटाची रिलीज डेट आधीच बदलली आहे. यापूर्वी हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता.

पण, राजामौली आता चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते म्हणाले की मी चित्रपट रिलीज पुढे ढकलणार नाही. राजधानी दिल्लीतील वाढत्या केसेस पाहता सिनेमागृहांना टाळे लावण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे.

रणवीर सिंगच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या '83' चित्रपटावर कोरोना विषाणूचा मोठा परिणाम झाला आहे. बॉक्स ऑफिसवर याचा विपरीत परिणाम झाला आहे.

ठरल्या तारखेलाच RRR होणार रिलीज
ठरल्या तारखेलाच RRR होणार रिलीज

आरआरआर चित्रपटाची स्टारकास्ट

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. 'RRR' ही तेलगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण व्यतिरिक्त, 'आरआरआर' मध्ये आलिया भट्ट, अजय देवगण, समुथिरकानी, रे स्टीव्हन्सन, ऑलिव्हिया मॉरिस आणि अॅलिसन डूडी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा - सुष्मिता सेनने सांगितले रोहमन शॉलसोबत ब्रेकअपचे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.