मुंबई - सध्या कोरोना विषाणूच्या कठीण परिस्थितीत कला विश्वातील कलाकार मदतीचा हात घेऊन पुढे सरसावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम फंडाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांनतर अनेक कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुख देखील मदतीसाठी समोर आला आहे.
शाहरुख खानने पीएम आणि सीएम फंडला मदत, साडेपाच हजार लोकांना जेवण तसेच अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार असल्याची घोषणा केली आहे.
शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेन्मेंटने सोशल मीडियावर ट्विट करत याची घोषणा केली आहे. आपल्या पोस्ट मध्ये शाहरुख खानने लिहिले आहे की, त्याची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स पीएम केअर फंडला पैसे देईल. या फ्रँचायझीचे सह मालक जय मेहता आणि जूही चावलादेखील मदत करतील.
-
. @vfx_redchillies @KKRiders @MeerFoundation @rotibankfdn @IndiaWpc @Ek7Foundation @pragyakapoor_ https://t.co/AIkzKE8T5h
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">. @vfx_redchillies @KKRiders @MeerFoundation @rotibankfdn @IndiaWpc @Ek7Foundation @pragyakapoor_ https://t.co/AIkzKE8T5h
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) April 2, 2020. @vfx_redchillies @KKRiders @MeerFoundation @rotibankfdn @IndiaWpc @Ek7Foundation @pragyakapoor_ https://t.co/AIkzKE8T5h
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) April 2, 2020
शाहरुख खान आणि गौरी खान महाराष्ट्र सीएम रिलीफ फंडालाही पैसे देणार आहेत. हे पैसे ते रेड चिलीज या कंपनीमार्फत देणगी म्हणून देतील. शाहरुख खान किती देणगी देणार आहे याबाबत खुलासा करण्यात आला नाही.
पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंड व्यतिरिक्त हेल्थ केअर प्रोफेशनल्सला शाहरुख खान मदत करणार आहेत. शाहरुख खानची आयपीएल फ्रेंचायजी, केकेआर आणि एनजीओ मीर फाउंडेशन आरोग्य सेवा व्यावसायिकांना 50 हजार वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे उपकरणे पुरवणार आहेत.
याव्यतिरिक्त, शाहरुखचे मीर फाउंडेशन एक महिन्यासाठी मुंबईतील सुमारे 5500 कुटुंबांना दररोज भोजन देईल. तसेच स्वयंपाकघरही बांधले जाणार आहे, जिथे दोन हजार कुटुंबे व रुग्णालयांसाठी जेवण बनवले जाईल.