मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानने मुलगा अब्राम खान आणि आर्यन खानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ही भावंडं गॅझेटवर गेम खेळण्यात मग्न असताना आईने तो सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपला. गौरीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर मुलांचे फोटो शेअर केले आणि फोटो शेअरिंग साइटवर चाहत्यांचे आणि मित्रांचे भरपूर प्रेम मिळवले.
आर्यन आणि अबराम बंधू प्रेमाचा आनंदी क्षण
गौरी खान ही निष्णात इंटीरियर डिझायनर आहे. तिने आपल्या इन्स्ट्राग्रामवर मोठा मुलगा आर्यन आणि लहान मुलगा अबराम यांचा फोटो शेअर केला. तिने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच फरहान अख्तर, झोया अख्तर, अमृता अरोरा, भावना पांडे आणि इतर सेलिब्रिटींनी तिच्या पेजवर हृदयाच्या इमोजीसह भरपूर प्रतिक्रिया दिल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आर्यनला अभिनयात करियर करायची इच्छा नाही
शाहरुख आणि गौरीचा मोठा मुलगा आर्यन बॉलिवूडमध्ये कधी प्रवेश करणार अशा चर्चा अधून मधून झडत असतात. मात्र अद्याप याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. आपल्या मुलांनी अगोदर शिक्षण पूर्ण करावे असे शाहरुखने म्हटले होते. आर्यन याला अभिनयात करियर करायचे नाही असा खुलासाही त्याने एकदा मुलाखतीत केला होता.
शाहरुखचा आगामी चित्रपट
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण आगामी पठाण या चित्रपटात काम करीत आहेत. या चित्रपटाचे बरचसे शूट मुंबईत पार पडले. यातील गाण्याच्या गाण्याच्या शुटिंगसाठी पठाणची टीम 7 ऑक्टोबर रोजी मल्लोर्का (स्पेन)ला जात आहेत. पठाण चित्रपट दृष्याच्या पातळीवर नेत्रदिपक बनवण्याचा टीमचा हेतू आहे. यापूर्वी कोणीही पाहिले नाही अशी दृष्ये यासाठी चित्रीत करण्याची महत्त्वकांक्षा सिद्धार्थ आनंद (दिग्दर्शक) आणि YRF बाळगून आहेत. यासाठी कोणताही कसूर सोडायचा नाही असे त्यांनी ठरवले आहे.
हेही वाचा - पठाण : शाहरुख, दीपिका स्पेनमध्ये प्रेक्षणीय स्थळावर करणार गाण्याचे शुटिंग