ETV Bharat / sitara

अधिकृत ! रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये अक्षयसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री - katrina kaif

अक्षयच्या अपोझिट यात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले होते.आता चित्रपटातील अभिनेत्रीचं नावही समोर आलं आहे

'सूर्यवंशी'मध्ये अक्षयसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री
author img

By

Published : Apr 22, 2019, 8:52 AM IST

मुंबई - अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. अशात रोहितने 'सिंबा' चित्रपटातूनच आपल्या आगामी चित्रपटाचीही घोषणा केली होती. 'सूर्यवंशी' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार हेदेखील जाहीर करण्यात आले होते.

मात्र, अक्षयच्या अपोझिट यात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले होते. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आता चित्रपटातील अभिनेत्रीचं नावही समोर आलं आहे. यात बॉलिवूडची चिकनी चमेली म्हणजे कॅटरिना कैफ अक्षयच्या अपोझिट झळकणार आहे.

अक्षय आणि कॅटरिनाने याआधी 'सिंग इज किंग', 'तीस मार खान', 'वेलकम', 'नमस्ते लंडन' आणि 'दे दना दन'सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तर रोहित शेट्टीसोबत कॅटरिनाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळे, प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच खास असणार आहे. चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.