ETV Bharat / sitara

दमदार अ‌ॅक्शनसह 'सूर्यवंशी', 'सिंबा' आणि 'सिंघम'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा ट्रेलर - सूर्यवंशी' ट्रेलर

'सूर्यवंशी'चा ट्रेलर तब्बल ४ मिनिटे १५ सेकंदांचा आहे. यामध्ये अक्षय कुमारसह रणवीर सिंग, अजय देवगन यांचीही धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळते.

Sooryavanshi trailer, Akshay kumar in Sooryavanshi, सूर्यवंशी' ट्रेलर, Sooryavanshi trailer launch
दमदार अ‌ॅक्शनसह 'सूर्यवंशी'सह 'सिंबा' आणि 'सिंघम'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा ट्रेलर
author img

By

Published : Mar 2, 2020, 1:32 PM IST

Updated : Mar 2, 2020, 1:44 PM IST

मुंबई - खिलाडी अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना आतुरता होती. अखेर, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. नुकताच 'सूर्यवंशी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुंबईत अक्षय कुमार, अजय देवगन, रणवीर सिंग, कॅटरिना कैफ, करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीत 'सूर्यवंशी'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आहे.

'सूर्यवंशी'चा ट्रेलर तब्बल ४ मिनिटे १५ सेकंदांचा आहे. यामध्ये अक्षय कुमारसह रणवीर सिंग, अजय देवगन यांचीही धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळते.

मुंबईवर होणाऱ्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला थांबण्यासाठी 'सूर्यवंशी'सह 'सिंबा' आणि 'सिंघम' काय कमाल करतात, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

हेही वाचा -'लक्ष्मी बॉम्ब'चे शूटिंग पूर्ण, कियाराने शेअर केला फोटो

रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील हा चौथा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत कॅटरिना कैफची मुख्य भूमिका आहे. २४ मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -तृतीयपंथींयासाठी अक्षय कुमारचे मोठे पाऊल, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Last Updated : Mar 2, 2020, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.