ETV Bharat / sitara

'सूर्यवंशी'ची उत्कंठा शिगेला, तब्बल ४ मिनिटांचा असणार ट्रेलर - akshay kumar latest news

एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारची यामध्ये भूमिका पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे.

Sooryavanshi Trailer release date, Sooryavanshi Trailer news, Sooryavanshi film release date, akshay kumar latest news, Sooryavanshi Trailer hastag
'सूर्यवंशी'ची उत्कंठा शिगेला, तब्बल ४ मिनिटांचा असणार ट्रेलर
author img

By

Published : Feb 29, 2020, 3:09 PM IST

मुंबई - खिलाडी अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची दिवसेंदिवस उत्सुकता वाढत चालली आहे. मागच्या वर्षीपासून हा चित्रपट चर्चेत आहे. शिवाय एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारची यामध्ये भूमिका पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. २ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. हा ट्रेलर तब्बल ४ मिनिटांचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबईमध्ये २ मार्चला ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडणार आहे. यावेळी 'सिंघम' अजय देवगण, 'सिंबा' रणवीर सिंग आणि 'सूर्यवंशी' अक्षय कुमार या तिघांचीही उपस्थिती राहणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवरील सर्व विक्रम मोडेल, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तसेच, बॉक्स ऑफिवरही या चित्रपटाच्या निमित्ताने त्सुनामी येईल, असे तरण आदर्श यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी'ची खास झलक, प्रदर्शनाची तारीख जाहीर

'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत कॅटरिना कैफची मुख्य भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. २४ मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील हा चौथा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही भूमिका आहे. आता 'सूर्यवंशी' चित्रपटाचा ट्रेलर काय कमाल दाखवतो, हे तर २ मार्चलाच समजेल.

हेही वाचा -'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार सोबत दिसणार जॅकी श्रॉफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.