ETV Bharat / sitara

महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया, सोनू सूदचे 'पुढचे पाऊल'

परप्रांतियांना घरी जाण्यासाठी मदत करणाऱ्या सोनू सूदने एका विद्यार्थीनीला मोठी मदत केली आहे. उत्तर प्रदेशातील २२ वर्षे वय असलेल्या प्रज्ञाचे दोन्ही गुढगे अपघातात खराब झाले होते. तिच्या मदतीला अभिनेता सोनू सूद धावून आला असून तिच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे.

sonu
सोनू सूद
author img

By

Published : Aug 14, 2020, 3:38 PM IST

गोरखपूर - उत्तर प्रदेशातील २२ वर्षे वय असलेल्या प्रज्ञाचे दोन्ही गुडघे अपघातात खराब झाले होते. शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम नसल्यामुळे ती गेली सहा महिने अंथरुणावर पडून होती. तिच्या मदतीला अभिनेता सोनू सूद धावून आला असून तिच्या गुढघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. शस्त्रक्रियेनंतर गुरुवारी प्रज्ञाने वॉकरच्या सहाय्याने काही पावले टाकली आहेत. प्रज्ञा ही विधी शाखेची विद्यार्थिनी आहे.

  • Have spoken to the doctor.

    Have lined up your travel too.

    Ur surgery will happen next week.

    Get well soon ❣️

    God bless.🙏 https://t.co/2aQSpXgsrl

    — sonu sood (@SonuSood) August 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका अपघातात प्रज्ञा गंभीर जखमी झाली होती आणि तिचे दोन्ही गुडघे खराब झाले होते. स्थानिक डॉक्टरांनी सांगितले की, शस्त्रक्रिया हा एकच पर्याय होता आणि त्यासाठी अंदाजे दीड लाख रुपये खर्च करावे लागतील. आम्हाला उपचार परवडणे शक्य नव्हते आणि बहुतेक नातेवाईकांनी मदत करण्यापासून पळ काढला", असे प्रज्ञाचे वडील विजय मिश्रा म्हणाले.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिने मदतीसाठी अभिनेता सोनू सूद याला ट्वीट केले. या ट्विटला सोनूने लगेचच उत्तर दिले. त्याने ट्विटमध्ये डॉक्टरांशी बोलणे झाले आहे तुम्ही दिल्लीला या असा निरोप दिला.

"डॉक्टरांशी बोललो आहे. तुमच्या प्रवासाचीही सोय केलीय. पुढच्या आठवड्यात तुमची शस्त्रक्रिया होईल. लवकर बरे व्हा. देव आशीर्वाद देओ," असे सूद यांनी ट्विट केले.

प्रज्ञाची गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया बुधवारी गाझियाबादमध्ये यशस्वी झाली आणि दोन ते तीन दिवसांत तिला डिस्चार्ज मिळेल.

हेही वाचा - सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी अंकिता आणि कृती सेनॉनने केली मागणी

"ट्रेनच्या तिकिटासह सर्व व्यवस्था सोनू सूद यांनी केली होती. आम्ही दिल्लीला पोहोचलो तेव्हा सोनू सूदची टीम आम्हाला रेल्वे स्टेशनवर भेटली आणि तेथून आम्हाला ताबडतोब इस्पितळात घेऊन गेले," तिचे वडील पुढे म्हणाले, " सोनू सूद आमच्यासाठी देव आहे. आजकाल अशा देवदूतांना शोधणे अवघड आहे. माझ्याकडे देण्यास काहीच नाही, परंतु अधिक आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी त्यांना असंख्य आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो. "

सोनूबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रज्ञा म्हणाली: "माझ्यासाठी सोनू सूद देव आहे. मी ठरवलं आहे की मी जेव्हा पैसे मिळवण्यास सुरूवात करेन तेव्हा शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना मी मदत करेन."

लॉकडाऊन दरम्यान सोनू सूद हजारो अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना बस, विशेष गाड्या आणि अगदी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था करून घरी पोहोचवण्यासाठी सक्रिय मदत करीत होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.