मुंबई - २०२१च्या आपल्या संकल्पाची माहिती देत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने शुक्रवारी पती आनंद आहूजासह शुक्रवारी नवीन वर्षाचे स्वागत केले. आपल्या नवऱ्याला 'माझ्या आयुष्यातील प्रेम', असे म्हणत सोनमने २०२१ सज्ज होत असल्याचे सांगितले आहे. तिने पतीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
सोनमचा नवीन वर्षाचा संकल्प
"हे वर्ष प्रेम, कुटुंब, मित्र, काम, प्रवास, आध्यात्मिक विकास आणि बर्याच गोष्टींनी परिपूर्ण असेल. मी फक्त आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ व्यतीत करण्यासाठी उत्सुक आहे," असे सोनमने लिहिले आहे.
तिने पुढे लिहिलंय, "आम्ही कठोर परिश्रम करू आणि संपूर्ण आयुष्य जगू आणि आम्ही मागे वळून पाहणार नाही ..."
सोनमने असा प्रकारे नवीन वर्षाचा संकल्प करीत शुभेच्छा दिल्यानंतर काही वेळातच लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
हेही वाचा - २०२० : वादग्रस्त बॉलिवूडकरांचे सोशल मीडियावर रंगलेले वाद
'ब्लाइंड' चित्रपटाच्या शूटिंगला ग्लासगोमध्ये सुरुवात
दरम्यान, एका प्रोफेशनल नोटवरून सोनमने तिच्या क्राइम-थ्रिलर 'ब्लाइंड' चित्रपटाच्या शूटिंगला ग्लासगोमध्ये किक-स्टार्ट केले आहे. शोम माखीजा दिग्दर्शित, सुजॉय घोष, अविशेक घोष, मनीषा डब्ल्यू, पिंकेश नहार, सचिन नाहर आणि ह्युनू थॉमस किम निर्मित हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका