मुंबई - अभिनेत्री सोनम कपूरने नवीन वर्षाचे स्वागत करीत एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केलाय. यात पती आनंद आहुजासोबत ती चुंबन घेताना दिसत आहे.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा बॉलिवूडमधील चर्चित जोडपं आहे. दोघेही नेहमी सुट्टीचा आनंद लुटताना दिसत असतात. त्यासोबतच सोशल मीडियावर नेहमी याचे अपडेट्स देत असतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सध्या सोनमने शेअर केलेल्या रोमँटिक व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''गेले दशक शानदार होते. मी काही चांगल्या चित्रपटात काम केले, इथं मला अनेक चांगल्या लोकांशी ओळख झाली, जे माझे आयुष्यभराचे मित्र बनले. मी रिया कपूरसोबत चित्रपट केले. तेव्हा लक्षात आले की आम्ही बहिणी उत्तम पार्टनरही होऊ शकतो. मी माझा जीवनसाथी आनंदला भेटले आणि त्याच्यासोबत संसार सुरू केला. आयुष्याचे अनेक रस्ते आहेत मात्र एकच निवडला पाहिजे, हे मला या दशकाने शिकवले. माझ्या परिवाराला आणि मित्रांना धन्यवाद.''
विचार करता सोनम अलिकडेच 'झोया फॅक्टर'मध्ये झळकली होती. तिच्यासोबत दुलकर सलमानची जोडी होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.