घटस्फोटोच्या केसेस सुशिक्षित आणि समृध्द कुटुंबात जास्त सापडतात. कारण शिक्षण आणि समृध्दीमुळे लोकांमध्ये अहंकारही येतो, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. यानंतर अनेक स्तरावर या विधानावर प्रतिक्रिया मिळत आहेत.
सरसंघचालकांच्या या विधानाला बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने आक्षेप घेतला आहे. तिने ट्विट करीत आपले उत्तर दिलंय. सोनम म्हणते, ''कोणता विवेकी माणूस असे बोलतो? प्रतिगामी मूर्ख विधान.''
-
Which sane man speaks like this? Regressive foolish statements https://t.co/GJmxnGtNtv
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) February 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Which sane man speaks like this? Regressive foolish statements https://t.co/GJmxnGtNtv
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) February 16, 2020Which sane man speaks like this? Regressive foolish statements https://t.co/GJmxnGtNtv
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) February 16, 2020
ट्विट केल्यानंतर तिच्या समर्थनार्थ अनेक चाहते उतरले आहेत. तिच्या ट्विटरवर असंख्य प्रतिक्रिया येत आहेत. यात सरसंघचालकांच्या या विधानाची उपरोधाने खिल्ली उडवली जात आहे.
दुसऱ्या बाजूला सोनम कपूरवर संघसमर्थकांनी टिकेची झोड उठवली आहे. सोनमवर टिका करणाऱ्यांनी तिच्या या विधानाला आक्षेप घेतला आहे.