मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस आहे. अशात सोनमनं नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा केल्या. बॉलिवूडमध्ये येण्याआधी आपलं वजन खूप जास्त होतं आणि अनिल कपूर नेहमीच वजन कमी करण्याचा आग्रह करत असत, असं सोनमनं म्हटलं आहे.
अनिल कपूर हे इतकं वय असतानादेखील आजही तितकेच तरुण आणि हँडसम दिसतात, असं मुलाखतकारानं म्हणताच सोनमनं आपणदेखील आपल्या वडिलांप्रमाणेच असल्याचं म्हटलं आहे. आपलं वय असूनही ते चेहऱयावरून दिसून येत नाही, हे सांगण्यासाठी तिने आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांची उदाहरणंदेखील दिली.
सावरियाँ चित्रपटात मी रणबीरसोबत स्क्रीन शेअर केली, तेव्हा मी त्याच्यापेक्षा खूप तरुण दिसायचे. त्यामुळे, दिग्दर्शकाने माझं वय दिसण्यासाठी मला प्रचंड मेकअप करायला लावला असल्याचं तिनं म्हटलं. तर इमरान खानसोबत काम करताना आपल्याला असा कोणताही फरक जाणवला नसल्याचं तिनं सांगितलं. आय हेट लव स्टोरी चित्रपट आला तेव्हा इमरान खूपच तरूण होता, असं तिनं म्हटलं आहे.