मुंबई - कलंक चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात माधुरी दीक्षितचीही भूमिका असल्याने तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव उत्तम असल्याचे चित्रपटातील कलाकारांनी म्हटले आहे. मात्र, यासोबतच सोनाक्षीने एक खंतही व्यक्त केली आहे.
चित्रपटात ती सत्या चौधरी या भूमिकेत झळकणार असून ती आदित्य रॉय कपूरच्या पत्नीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. सत्याचं पात्रच असं आहे, की तिला माधुरी मॅमसोबत डान्स करण्याची संधी मिळाली नाही, असे सांगत सोनाक्षीने खंत व्यक्त केली आहे. मात्र, माधुरीसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याने तिने आनंदही व्यक्त केला आहे.
यासोबतच आलियानेही माधुरीच्या हास्याचे, नृत्याचे आणि अभिनयाचे कौतुक करत तिने आपल्या प्रोत्साहित केल्याचे म्हटले आहे. निश्चितच तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. आता या अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट यशस्वी ठरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.