मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे. या बातमीसोबतच सलमान आणि सोनाक्षीचा फोटोशॉप केलेला फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान अभिनेत्री सोनाक्षीला अंगठी घातल्याचे दिसत आहे. हे फोटोशॉप केलेले फोटो यापूर्वीच समोर आले आहे. असे असतानाही सलमान-सोनाक्षीच्या लग्नाची अफवा थांबण्याचे नाव घेत नाहीये. यावर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया आली आहे.
सोनाक्षीने या व्हायरल फोटोला पूर्णपणे फेक म्हटले आहे आणि ही अफवा खरी मानणाऱ्यांची खिल्लीही उडवली आहे. या व्हायरल फोटोवर सोनाक्षीने प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, 'तुम्हा इतके मूर्ख आहात का की मूळ आणि मॉर्फ्ड ( बदललेले ) चित्र यात फरक करू शकत नाही. असे लिहित सोनाक्षीने हसणारा इमोजीही शेअर केला आहे.
काय आहे या व्हायरल फोटोचे सत्य?
या व्हायरल फोटोच्या सत्यतेबद्दल सांगायचे तर, हा दक्षिणात्य अभिनेता आर्याचा एंगेजमेंट फोटो आहे. अभिनेता आर्यासोबतची ही वधू म्हणजे तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची अभिनेत्री सायशा. आर्या आणि सायशा यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. सायशा ही दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानोची नातेवाईक आहे.
सोनाक्षी सिन्हाने 2010 मध्ये सलमान खान स्टारर दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दबंग व्यतिरिक्त सोनाक्षी सलमानसोबत इतर कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही.
हेही वाचा - शाहरुख, दीपिका 'पठाण' शूटसाठी स्पेनला रवाना - पाहा व्हिडिओ