ETV Bharat / sitara

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालने केली लग्नाची घोषणा, ‘या’ तारखेला चढणार बोहल्यावर.. - अभिनेत्री काजल अग्रवाल

अभिनेत्री काजल अग्रवालने लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिलेली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी गौतम किचलू याच्यासोबत विवाहबद्ध होणार असल्याचे तिने या पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.

Kajal Agarwal
काजल अग्रवाल
author img

By

Published : Oct 6, 2020, 4:57 PM IST

मुंबई - बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतली सुपरस्टार अभिनेत्री काजल अग्रवाल हिने आपल्या फॅन्सना एक सुखद धक्का दिला आहे. आपण लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिलेली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी गौतम किचलू याच्यासोबत विवाहबद्ध होणार असल्याचे तिने या पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.

Kajal Agarwal announces marriage
काजल अग्रवालने केली लग्नाची घोषणा

काजलने आपल्या करिअरमध्ये ‘सिंघम’, ‘स्पेशल २६’, ‘मगधिरा’ यासारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिलेले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती गौतम किचलू या मुंबईतील उद्योगपतीला डेट करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या असून काजल त्याच्याशीच आता कायमची लग्नगाठ बांधणार असल्याचे तिने स्वतः जाहीर करून टाकले आहे.

गौतम हा पेशाने इंटेरिअर डिझायनर असून काही डिजिटल ऍप्स बनवण्यात देखील त्याची कंपनी कार्यरत आहे. लग्नाबाबत टाकलेल्या स्पेशल पोस्टमध्ये काजलने आपण येत्या ३० ऑक्टोबर रोजी गौतमसोबत लग्न करणार आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या विवाह सोहळ्याला फक्त दोघांच्या कुटुंबातील निकटवर्तीय मंडळी उपस्थित राहतील. कोरोनामुळे आमच्या उत्साह आणि आनंदाला वेसण घालावी लागत असली तरीही, तुम्ही जिथे कुठे असाल तेथून तुम्ही आम्हाला नक्की तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्याल असं तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यासोबतच लग्नानंतर देखील आपण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आपले काम करतच राहू, हेही तिने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लग्नानंतर काजल सिनेमात काम करणार की नाही..? याबाबत तिचं उत्तर ‘हो’ असेच आहे... काजलने नेहमीच आपल्या हसऱ्या आणि आनंदी चेहऱ्याच्या बळावर देश-परदेशातील प्रेक्षकांच्या मनात आपल्यासाठी एक विशेष स्थान तयार केले होते. लग्नानंतर हाच आनंद तिला आयुष्यभर मिळो, हीच तिच्या फॅन्सची इच्छा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.