ETV Bharat / sitara

गायक शानच्या आईचे निधन, बॉलिवूडकरांनी वाहिली श्रध्दांजली - बॉलिवूडने वाहिली श्रध्दांजली

गायक-संगीतकार शानने गुरुवारी सांगितले की त्याची आई सोनाली मुखर्जी यांचे निधन झाले आहे. आदल्या दिवशी गायक कैलाश खेर यांनी मुखर्जी यांच्या निधनाची बातमी देत शोक व्यक्त केला होता.

गायक शानच्या आईचे निधन
गायक शानच्या आईचे निधन
author img

By

Published : Jan 21, 2022, 1:01 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - पार्श्वगायक-संगीतकार शानने गुरुवारी सांगितले की त्याची आई सोनाली मुखर्जी यांचे निधन झाले आहे. सानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक कौटुंबिक निवेदन पोस्ट केले आणि म्हटले की त्याच्या आईचे "झोपेत शांतपणे" निधन झाले.

शानची पत्नी राधिका, बहीण सागरिका आणि तिचा पती मार्टिन यांच्या स्वाक्षरी असलेल्या या निवेदनामध्ये लिहिलंय की, "आमची आई श्रीमती सोनाली मुखर्जी यांच्या निधनाने आम्हाला खूप दु:ख झाले आहे. त्यांचे झोपेत असताना शांतपणे निधन झाले."

"हे आम्हा सर्वांसाठी खूप मोठे नुकसान आहे. तिला अखेरचा निरोप देत असताना सध्या कोविड असल्यामुळे आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही केवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करा.'', असे शानने पुढे लिहिले आहे.

आदल्या दिवशी गायक कैलाश खेर यांनी शानची आई सोनाली मुखर्जी यांच्या निधनाची बातमी दिली आणि शोक व्यक्त केला होता.

अनेक चित्रपटसृष्टींनी शान आणि त्याच्या कुटुंबियांना शोकसंवेदना पाठवल्या आहेत.

अभिनेता टायगर श्रॉफने कॉमेंटमध्ये लिहिले की, "सर कुटुंबासाठी शोक व्यक्त करतो. ती जिथे आहे तिथे आनंदी आणि निरोगी असेल."

शास्त्रीय संगीतकार अयान अली खान यांनीही पोस्ट लिहून त्यांना श्रध्दांजली वाहिती आहे.

हेही वाचा - मामुटीनंतर दुलकीर सलमानलाही झाली कोरोनाची बाधा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.