मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. तर सिद्धार्थच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्तने जगाचा निरोप घेतला. आज (3 सप्टेंबर) मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याच्या अनेक आठवणी सध्या त्याचे चाहते शेअर करताना दिसत आहेत.
हेही वाचा- सिध्दार्थच्या निधनाने शहनाझ गीलवर कोसळला दुःखाचा डोंगर
बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेली जोडी शेहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला चाहत्यांचे फारच आवडते होते. शेहनाझ ही सिद्धार्थची अगदी जवळची मैत्रीण होती. तर त्याची कथित प्रेयसी असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थच्या मृत्युनंतर शेहनाझला मोठा धक्का बसला आहे. कारण, त्यावेळी शेहनाझ देखील तिथेच उपस्थित होती. सिद्धार्थचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं कूपर रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान रात्रीपासून सिद्धार्थला फार अस्वस्थ वाटत होतं, असं पुढं येत आहे.
हेही वाचा- वाचा.... सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपूर्वीचा घटनाक्रम
हाती आलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ रात्री 9:30 वाजता घरी आला होता. त्यावेळी त्याला बरं वाटत नसल्याचं त्याने आपल्या आईला सांगितलं होतं. तेव्हा शेहनाझ देखील तिथेच होती. त्यामुळे त्यांनी आधी सिद्धार्थला लिंबू पाणी पिण्यास दिलं व नंतर आईसक्रिम दिली. जेणेकरून त्याला बरं वाटेल. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सिद्धार्थला अजूनही बरं वाटत नव्हतं. तेव्हा शेहनाझ आणि त्याच्या आईला त्याला आराम करण्यास सांगितलं.
हेही वाचा- सिध्दार्थ घरी परतला तेव्हा त्याच्या कारची काच फुटली होती..नेमक रात्री काय घडले?
मृत्यूपूर्वी सिद्धार्थ शेहनाझच्या मांडीवर?
तर, सिद्धार्थ झोपू शकत नव्हता. लागोपाठ त्याला अस्वस्थ आणि बेचैन जाणवत होतं. तेव्हा त्याने शेहनाझला आपल्या सोबत राहण्यास सांगितलं व पाठ थोपटण्यास सांगितली. 1:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ शेहनाझच्या मांडीवर झोपी गेला. नंतर दुसरीकडे सरकत तो झोपला. त्यानंतर 7 वाजता शेहनाझ देखील झोपी गेली. पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की, सिद्धार्थच्या त्याच अवस्थेत झोपला आहे जसा रात्री झोपला होता. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो कोणतीच हालचाल करत नव्हता.
हेही वाचा - मृत्यूपूर्वी रात्री कुठे गेला होता सिध्दार्थ शुक्ला?
सिद्धार्थ कोणतीच हालचाल करत नाही हे पाहून शेहनाझ घाबरली. तिने ताबडतोब त्याच्या आईकडे 5 व्या मजल्यावर धाव घेतली. जिथे सिद्धार्थचं कुटुंब राहतं. तर सिद्धार्थ आणि शेहनाझ हे 12 व्या मजल्यावर होते. त्यानंतर सिद्धार्थच्या फॅमिली डॉक्टरला बोलावण्यात आलं. मात्र तोपर्यंत सिद्धार्थचा मृत्यू झाला होता.
शेहनाझला मोठा धक्का
सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांसह शेहनाझलाही मोठा धक्का बसला. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ती सध्या मोठ्या मानसिक धक्क्यातून जात आहे. सिद्धार्थचा मृत्यू तिने अजूनही स्विकारला नाही.