हैदराबाद: रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थला नेटिझन्सनी 'साऊथ का स्वरा' म्हटले आहे. त्याने जेव्हा आपली पोस्ट ट्विटरवर शेअर करीत असताना त्याने ही पोस्ट स्वरा भास्करला टॅग केली. त्यानंतर स्वरा भास्करने त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
एका अभिनेत्रीव्यतिरिक्त, स्वरा भास्कर सामाजिक-राजकीय विषयांवर आवाज उठविणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. असाच लौकिक दक्षिण भारतात सिद्धार्थने मिळवला आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता सिध्दार्थ आपली मते मांडत असतो. त्यामुळेच नेटिझन्सनी त्याला 'दक्षिण का स्वरा' असा टॅग दिला आहे आणि या नवीन ओळखीमुळे तो स्पष्टपणे आनंदी दिसत आहे.
-
You are India ka Siddharth and we are soooooo thankful for you! ♥️
— Swara Bhasker (@ReallySwara) May 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Also, hey Hottie! 🤓🤓😍😍 https://t.co/u03BsphkF6
">You are India ka Siddharth and we are soooooo thankful for you! ♥️
— Swara Bhasker (@ReallySwara) May 6, 2021
Also, hey Hottie! 🤓🤓😍😍 https://t.co/u03BsphkF6You are India ka Siddharth and we are soooooo thankful for you! ♥️
— Swara Bhasker (@ReallySwara) May 6, 2021
Also, hey Hottie! 🤓🤓😍😍 https://t.co/u03BsphkF6
शुक्रवारी, सिद्धार्थने ट्विटरवर लिहिले की, "हिंदी भाषिक जनता मला दक्षिण का स्वरा म्हणत आहे. फक्त स्पष्ट करतो की... मी आनंदाने कोठूनही किंवा केव्हाही स्वरा होईन. ती खूप छान आणि सुंदर आहे." स्वराने सिद्धार्थच्या ट्विटला प्रतिक्रिया देऊन कौतुक केले आणि लिहिले की, "तू भारतचा सिद्धार्थ आहेस आणि आम्ही तुझे आभारी आहोत! शिवाय तू हॉटी आहेस!"
दरम्यान, काल स्वरा ही ट्विटरच्या ट्रेंडमुळे आश्चर्यचकित झाली होती कारण ती २४ तासांपेक्षा मायक्रोब्लॉगिंग साइटवर ट्रेंड करीत होती पण त्याचे कारण तिलाही कळले नव्हते. आश्चर्यचकित झालेल्या स्वराने इन्स्टाग्राम स्टोरीजवर ट्विटर ट्रेंडचे विविध स्क्रीनशॉटही शेअर केले आणि "#trendingbutwhy" लिहिले.
वर्क फ्रंटवर स्वरा सध्या आगामी 'चल चार यार' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये असून यात मेहेर विज आणि पूजा चोप्रादेखील आहेत. कमल पांडे दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटाचे पहिले शेड्यूल लखनौमध्ये पार पडले.
हेही वाचा - बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर स्वरा भास्करने दिली अशी प्रतिक्रिया...