ETV Bharat / sitara

शुभ मंगल ज्यादा सावधान : पहिल्यांदा असा भेटला होता आयुष्यमानला जितेंद्र - शुभ मंगल ज्यादा सावधान : पहिल्यांदा असा भेटला होता आयुष्यमानला जितेंद्र

समलैंगिकतेच्या विषयाभोवती गुंफलेल्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्ये आयुष्यमान आणि जितेंद्र यांच्यातील प्रेमकथा आहे. आयुष्यमानला जितेंद्र कधी आणि कुठे भेटला होता याचा खुलासा केला आहे.

shubh-mangal-jyada-savadhan
शुभ मंगल ज्यादा सावधान
author img

By

Published : Feb 6, 2020, 5:04 PM IST

मुंबई - अभिनेता जितेंद्र कुमार 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात आयुष्यमान खुराणाच्या अपोझिट दिसणार आहे. आयुष्यमानला पहिल्यांदा कसे भेटलो याचा किस्सा जितेंद्रने सांगितला आहे.

जितेंद्र म्हणाला, ''मी २००९ ला आयुष्यमानला भेटलो होतो, तेव्हा मी आयआयटी खडगपूरचा विद्यार्थी होतो. तो एमटीव्हीच्या वतीने एका महोत्सवासाठी आला होता. या फेस्टचे नाव स्प्रिंगफेस्ट होते आणि आम्ही 'रोडीज'चे चाहते होतो. आम्ही त्यादिवशी आयुष्यमानची भेट घेतली आणि फोटो काढले.''

जितेंद्र पुढे म्हणाला, ''कॉलेजचे ते आमचे पहिले वर्ष होते. आम्ही त्याची रुम शोधत गेलो आणि त्याने आमचे स्वागत केले होते.''

यानंतर जितेंद्र म्हणाला, ''त्याने आमच्यासोबत अनुभव शेअर केले आणि आपल्या कॉलेजच्या दिवसातील किस्से सांगितले. योगायोगाने त्यावेळी आम्ही समलैंगितेच्या विषयावरही बोललो. हे माहिती नव्हतं की १० वर्षानंतर त्याच्यासोबत काम करायला मिळेल.''

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट समलैंगिकतेच्या विषयाभोवती गुंफलेला आहे. हितेश कैवल्यने याचे दिग्दर्शन केले असून आनंद एल रॉय यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.