ETV Bharat / sitara

गेल्या वर्षीच 'आई' बनलीय श्रिया, 'दृश्यम’ फेम श्रिया सरनचा चाहत्यांना दे धक्का!! - Shriya Saran shared the video

'दृश्यम’ चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरन हिने एक व्हिडिओ पोस्ट करुन आपण आई झाल्याची बातमी चाहत्यांना कळवली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. याकाळात ती स्पेनमध्ये पती आंद्रेई कोस्चीवशीसोबत राहात होती. आता दोघेही भारतात परतली असून आई बनल्याची बातमी तिने दिली आहे.

अभिनेत्री श्रिया सरन
अभिनेत्री श्रिया सरन
author img

By

Published : Oct 12, 2021, 5:55 PM IST

'दृष्यम' चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरनने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ती 2020 मध्येच एका मुलीची आई बनली आहे. श्रियाने पहिल्यांदाच मुलीच्या जन्माविषयी माहिती दिली आहे. तिने 2018 मध्ये रशियन बॉयफ्रेंड आंद्रेई कोस्चीवशी लग्न केले होते. या वर्षी ऑगस्टमध्ये ती स्पेनमधून भारतात परतली, तेव्हापासून तिच्या गर्भधारणेच्या अफवा पसरल्या होत्या. आपल्या पोस्टद्वारे श्रियाने या अफवांना ब्रेक लावला आहे.

व्हिडिओ शेअर करुन दिली मुलीच्या जन्माची बातमी

श्रियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पती आणि मुलीसोबत दिसत आहे. या जोडप्याने त्यांच्या आयुष्याच्या या नव्या टप्प्याचा उल्लेख केला आहे. श्रिया लिहिते, 'नमस्कार मित्रांनो, आम्ही खूप क्रेझी होतो, परंतु 2020 चे क्वारंटाईनचा काळ आमच्यासाठी संस्मरणीय होता. संपूर्ण जग गोंधळात असताना, आमचे जग पूर्णपणे बदलले होते. आमचे जग साहस, उत्साह आणि शिकण्याने भरलेले होते. एक देवदूत आमच्या जगात आला. यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो.

स्पेनमध्ये घालवला लॉकडाऊनचा काळ

आंद्रे हा एक रशियन टेनिस खेळाडू आणि उद्योजक आहे जो मूळचा बार्सिलोना, स्पेनचा आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघेही बार्सिलोनामध्ये होते. आता श्रिया आणि आंद्रे भारतात परतले आहेत.

श्रियाचा आगामी चित्रपट

श्रिया ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये गाजलेल्या 'दृष्यम' चित्रपटामुळे ती देशभर ओळखीची झाली. एसएस राजामौली यांच्या आगामी बहुप्रतीक्षित 'आरआरआर' चित्रपटामध्ये श्रिया दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2022 मध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा - कार्तिक आर्यनचा अजून एक ‘धमाका’, रोमँटिक थ्रिलर 'फ्रेडी' साठी वाढवले १४ किलो वजन!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.