ETV Bharat / sitara

'साहो' चित्रपटावर श्रद्धा कपूरची प्रतिक्रिया, म्हणते....

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आहे. हा अनुभव किती सुंदर होता, हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला हा चित्रपट आवडेल अशी आशा करते, असं श्रद्धा म्हणाली.

author img

By

Published : Aug 10, 2019, 8:57 PM IST

श्रद्धा कपूर

मुंबई - श्रद्धा कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. 'साहो' या बिग बजेट चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मुंबईमध्ये आयोजित या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला श्रद्धा कपूरनं हजेरी लावली होती.

या इव्हेंटरम्यान श्रद्धाने या चित्रपटाबद्दल आणि प्रभाससोबत काम करण्याबद्दलचा आपला अनुभव शेअर केला. एका अशा चित्रपटाचा भाग बनून मला खरंच खूप आनंद होत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आहे. हा अनुभव किती सुंदर होता, हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला हा चित्रपट आवडेल अशी आशा करते, असं श्रद्धा म्हणाली.

पुढे ती म्हणाली, साहो हा एक अॅक्शन चित्रपट असण्यासोबतच यात खास लव्हस्टोरीही आहे. तर प्रभाससोबतच्या केमिस्ट्रीबद्दल विचारले असता, हे मी कसे सांगू. चित्रपट पाहून प्रेक्षकच हे ठरवतील, असं ती म्हणाली. या सिनेमात श्रद्धा अमृता नायर नावाच्या गुन्हे शाखेतील महिला अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. येत्या ३० ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.