ETV Bharat / sitara

'कुली नंबर १'च्या चित्रीकरणाला थायलंडमध्ये सुरूवात, पाहा व्हिडिओ - सिनेमा

लेखक फरहाद सामजी यांनी चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत कुली नंबर १ च्या चित्रीकरणाचा पहिला दिवस, असं त्यांनी म्हटलं आहे.

'कुली नंबर १'च्या चित्रीकरणाला थायलंडमध्ये सुरूवात
author img

By

Published : Aug 7, 2019, 6:39 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा ज्यूनिअर धवन म्हणजेच वरूण स्ट्रीट डान्सरचं शूटींग पूर्ण करताच आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. कुली नंबर १ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आजपासून वरूण आणि सारा अली खानने आपल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे.

या रिमेकचे लेखक फरहाद सामजी यांनी चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत कुली नंबर १ च्या चित्रीकरणाचा पहिला दिवस, असं त्यांनी म्हटलं आहे. थायलंडमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे.

दरम्यान कुली नंबर १ या ओरिजनल सिनेमात गोविंदा आणि करिश्मा कपूर ही जोडी झळकली होती. तर सिनेमाचं दिग्दर्शन डेविड धवन यांनी केलं होतं. या सिनेमाच्या रिमेकचं दिग्दर्शनही डेविड धवनच करणार आहेत. आता १९९५ मध्ये सिनेमागृह गाजवलेला हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.