मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा याला अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक झाली होती. या अटकेनंतर शर्लिन चोप्रा या मॉडेल-अभिनेत्रीने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर राज कुंद्रा वर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र हे आरोप खोटे असल्याचे सांगत कुंद्रा याने शर्लिनवर 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. कुंद्रा यांच्या या दाव्याला शर्लिन चोप्रानेही नुकतेच उत्तर दिले आहे.
शर्लिनने नोटिशीचे उत्तर केले पोस्ट
शर्लिन चोप्राने राज कुंद्रा यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्याला 23 ऑक्टोबर रोजी कायदेशीर उत्तर पाठवले आहे. कुंद्रा यांना पाठवलेल्या नोटीसच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत ट्विटरच्या माध्यमातून सोशल माध्यमावर तिने पोस्ट केली आहे. रिपू सुदाम उर्फ राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या मानहानीचा नोटिशीला उत्तर म्हणून आपण हे पोस्ट करीत असल्याचं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काय केले ट्विट?
यासंदर्भात शर्लिनने काही ट्विट लागोपाठ पोस्ट केले आहेत. यामध्ये "हिम्मत का मतलब यह नही है, की आप करेंगे ही नही. बल्कि हिंमत का मतलब है, की कोई डर आपको रोक नही सकता" असे ती ट्विटमध्ये म्हणते.
शर्लिनने पोस्ट केला तक्रारींचा घटनाक्रम
शर्लिनने तिच्या एका पोस्टमध्ये तक्रारींचा घटनाक्रम पोस्ट केला आहे. यामध्ये ती असं म्हणते, '14 एप्रिल रोजी मी जुहू पोलिस ठाण्यात राज कुंद्रा विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली, तर 19 एप्रिल रोजी राज कुंद्रा माझ्या घरी आला आणि त्याने मला धमकावलं'.
हेही वाचा - "मी गुपचुप तुझ्याकडून गांजा घेईल" अनन्या-आर्यनचे "ते" कथित व्हाटसअॅप चॅट आले समोर!
काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
काय होते शर्लिनचे आरोप?
शर्लिन चोप्राने 14 ऑक्टोबर रोजी राज आणि शिल्पाविरोधात एफआयआर दाखल केली. शर्लिनने फसवणूक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी ही तक्रार दाखल केली होती. शर्लिनने राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल करत म्हटलं होतं की, मी जेएल स्ट्रीम कंपनीसाठी तीन व्हिडिओ शूट केले होते, पण मला वचन दिल्याप्रमाणे पैसे दिले गेले नाहीत. मुलींना त्यांचं शरीर दाखवण्याचे पैसे देऊन तुम्ही त्यांचे पैसे का देत नाही, तुम्ही त्यांची फसवणूक का करता? तुम्ही त्यांना टोपी का घालता? हा नैतिक व्यवसाय आहे का? असा सवाल शर्लिनने केला होता.
शिल्पा आणि राज यांची शर्लिन चोप्राविरोधात काय तक्रार?
शिल्पा शेट्टीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तिचा जेएल प्रवाहाशी काहीही संबंध नाही. अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली. तो सध्या जामीनावर बाहेर आहे. गेल्या काही महिन्यांत शर्लिनने राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले होते. शर्लिन म्हणाली होती की, राज कुंद्रा यांनीच तिला अश्लिल उद्योगात आणलं.
एप्रिल 2021 मध्ये शर्लिनने राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा आरोप करत एफआयआर दाखल केली. शर्लिनने सांगितलं होतं की, राज कुंद्रा 27 मार्च २०१९ रोजी तिला न सांगता बिझनेस मीटिंगनंतर तिच्या घरी आला होता. शर्लिनने आरोप केला की, राजने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली, तर ती असं करण्यास नकार देत राहिली.
हेही वाचा - साधू संत तपासणार स्क्रिप्ट, मगच मिळेल 'मध्य प्रदेश'मध्ये शूटिंगला परवानगी प्रज्ञा ठाकूर