ETV Bharat / sitara

विकी कौशलचे वडील शाम कौशल यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल - Sham Kaushal video viral

सध्या विकी कौशलचे वडील शाम कौशल यांचा व्यायाम करीत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाम कौशल दोरीने कसरत करताना दिसत आहेत.

विकी कौशलचे वडील शाम कौशल
विकी कौशलचे वडील शाम कौशल
author img

By

Published : Jan 4, 2022, 4:06 PM IST

मुंबई - नुकतेच विकी कौशल आणि कॅटरिना कैफचे लग्न झाले. या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. आता विकीचे वडील शाम कौशल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही यूजर्स म्हणत आहेत की, कॅटरिना कैफ घरात आल्यानंतर हे तर करावंच लागेल, तर काही जण म्हणत आहेत की, कॅटरिना घरात येताच सासऱ्यामध्ये एनर्जी आली.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शाम कौशल दोरीने कसरत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाम जिमचे कपडे घालून घाम गाळताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वडील आणि मुलगा त्यांच्या फिटनेसबाबत किती जागरूक आहेत याची खात्री पटली आहे. दोघेही अनेकदा एकत्र जिममध्ये जाताना दिसले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक यूजर्स शाम कौशलचे कौतुकही करत आहेत.

शाम कौशलचा हा बॅटल रोप व्यायाम पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या वयातही ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती कसरत करत आहेत. मात्र यात आश्चर्यकारक काहीही नाही कारण स्टंट आणि अ‍ॅक्शन हा त्यांचा व्यवसाय आहे. शाम कौशल हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक आहेत. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांतील नेत्रदीपक अॅक्शन सीन्स शाम कौशलमुळे पाहायला मिळाले आहेत. त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

शाम कौशलने क्रिश, कमिने, 'बजरंगी भाईजान', 'दंगल', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'राम लीला', 'धूम 3', 'गुंडे', 'लक्ष्मी' यांसारख्या चित्रपटांमध्ये अॅक्शन दिग्दर्शक म्हणून आपली छाप सोडली आहे.

हेही वाचा - Nupur Body Transformation : आमिरची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपूरचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.