मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना चित्रपटांपासून दूर असूनही नेहमी चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमी स्वतःचे फोटो शेअर करीत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.
सध्या तिचा एक फोटो चाहत्यांमध्ये कमालीचा उत्सुकतेचा विषय झालाय. हा फोटो आहे एका पार्टीतला. सुहाना खान तिच्या मैत्रीणींसह एन्जॉय करीत असताना दिसत आहे. सुहाना सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुहाना खानचा हा फोटो तिच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत.
सुहानाने पदवीपर्यांतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. तिला रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची इच्छा असल्याचे तिने बोलून दाखवलंय. मात्र शाहरुखने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला तिला दिला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती सिनेक्षेत्रात येईल याची प्रतीक्षा तिचे चाहते करीत आहेत.