मुंबई - जर्सी या चित्रपटाच्या शूटींगला चंदिगड येथे सुरुवात झाली आहे. शाहिद कपूर यात प्रमुख भूमिका साकारणार आहे. तेलुगुमध्ये गाजलेल्या जर्सी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. याचे दिग्दर्शन मूळ तेलुगु चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले गौतम टीन्नानुरी करीत आहेत. यात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याची महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
Filming begins... #Jersey shooting starts in #Chandigarh... Stars #ShahidKapoor, #MrunalThakur and #PankajKapur... Directed by Gowtam Tinnanuri, who also helmed the original #Telugu version... 28 Aug 2020 release. pic.twitter.com/AokWgPA6e0
— taran adarsh (@taran_adarsh) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Filming begins... #Jersey shooting starts in #Chandigarh... Stars #ShahidKapoor, #MrunalThakur and #PankajKapur... Directed by Gowtam Tinnanuri, who also helmed the original #Telugu version... 28 Aug 2020 release. pic.twitter.com/AokWgPA6e0
— taran adarsh (@taran_adarsh) December 14, 2019Filming begins... #Jersey shooting starts in #Chandigarh... Stars #ShahidKapoor, #MrunalThakur and #PankajKapur... Directed by Gowtam Tinnanuri, who also helmed the original #Telugu version... 28 Aug 2020 release. pic.twitter.com/AokWgPA6e0
— taran adarsh (@taran_adarsh) December 14, 2019
जर्सी या तेलुगु चित्रपटाला दक्षिणेत तुफान प्रतिसाद मिळाला होता. एका क्रिकेटरची ही कथा आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धुंवाधार खेळी करणाऱ्या या क्रिकेटरच्या जीवनात एक असे वळण येते, की प्रेक्षक स्तब्ध होऊन जातात. जर्सी चित्रपटाला तेलुगुत मिळालेले यश हिंदीतही मिळेल याची खात्री निर्मात्यांना वाटते. शाहिद कपूरने यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळत असतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
-
#jersey #prep pic.twitter.com/0huoKgK0Wo
— Shahid Kapoor (@shahidkapoor) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#jersey #prep pic.twitter.com/0huoKgK0Wo
— Shahid Kapoor (@shahidkapoor) November 21, 2019#jersey #prep pic.twitter.com/0huoKgK0Wo
— Shahid Kapoor (@shahidkapoor) November 21, 2019
शाहिद कपूरने अलिकडेच अर्जुन रेड्डी या तेलुगु चित्रपटाचा कबीर सिंग हा हिंदी रिमेक केला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे जर्सी या तेलुगु चित्रपटातही नायकाचे नाव अर्जुन असेच आहे. हिंदी रिमेकमध्ये हेच नाव राहणार की बदल होणार हे लवकरच कळेल.
एक ह्रदयस्पर्शी अशी कथा असलेला जर्सी चित्रपट २८ ऑगस्ट २०२० मध्ये रिलीज होणार आहे.