मुंबई - अभिनेता शाहिद कपूरने म्हटलंय की नवीन चित्रपटासाठी तयार होण्यापूर्वी त्याला थोडी विश्रांती घ्यायची आहे. कोविड-१९ ची भीती असल्यामुळे सावधगिरी बाळगत तो 'जर्सी' सिनेमाचे शुटिंग ४७ दिवस करीत होता.
शाहिदने इंस्टाग्रामवर आपला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आणि लिहिलंय, "आणखी एक प्रवास संपला. मी पुन्हा एकदा कोणीतरी होण्यापूर्वी मला आवश्यक आहेत...स्वतःसाठी काही दिवस.''
![Shahid Kapoor](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9920288_shahid.jpg)
'जर्सी' ही अर्जुन नावाच्या प्रतिभावान पण अपयशी क्रिकेटपटूविषयीची गोष्ट आहे. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीस वर्षे वय ओलांडलेला अर्जुन पुनरागमन करून भारताकडून खेळण्याचा निर्णय घेतो. हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'जर्सी' याच नावाच्या तेलगू हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन गौतम तिन्नुरी यांनी केले आहे, त्यांनी २०१० च्या मुळ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.
हेही वाचा - 'रश्मी रॉकेट'साठी तापसी पन्नू घेतेय कठोर प्रशिक्षण, नवीन फोटो केले शेअर
या वर्षाच्या सुरूवातीला शाहिदने खुलासा केला होता की 'जर्सी'नंतर तो एका अॅक्शन फिल्ममध्ये दिसणार आहे. शाहिदने शशांक खेतानच्या योद्धा नावाच्या अॅक्शन चित्रपटाला होकार दिला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने याची निर्मिती केली जाणार आहे.
हेही वाचा - संजना सांघीने 'ओम' वर काम केले सुरू