मुंबई - अभिनेता शाहिद कपूरने चित्रपट निर्माते शशांक खेतान यांच्या आगामी योद्धा या चित्रपटाची निवड रद्द केली आहे. शाहिदने करण जोहरच्या प्रॉडक्शनला होकार दिला होता पण आता या प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे.
चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शाहिदने 'जर्सी'चे शूटिंग संपल्यानंतर योद्धावर काम सुरू केल्याचे सांगितले जात होते. आता त्याने जर्सीचे शुटिंग संपवले आहे. त्यामुळे तो आता योध्दाचे शुटिंग सुरू करणार अशी अटकळ बांधली जात होती. तथापि, एका अग्रगण्य वेबलोइडने दिलेल्या अहवालानुसार शाहिदने क्रिएटिव्ह मतभेदांमुळे चित्रपटाची निवड रद्द केली आहे.
हेही वाचा- सिध्दार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदान्नाचा 'मिशन मजनू'चा पहिला लूक
दरम्यान, शाहिद कपूर या पुढे अॅमेझॉन प्राइमसाठी चित्रपट निर्माते राज आणि डीके या जोडीच्या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तामिळ सुपरस्टार विजय सेतुपती देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. जानेवारीपासून शाहिद वेब सीरिजसाठी शूट सुरू करेल. अद्यापही शीर्षक ठरले नसलेल्या या मालिकेचे शुटिंग मुंबई आणि गोव्यातील विविध लोकेशन्सवर केले जाईल.