मुंबई - शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्पेनमध्ये 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात गुंतले आहेत. गेल्या आठवड्यात स्टारकास्ट स्पेनला रवाना झाली होती. आता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचे स्पेनमधून शूटिंग करतानाचा फोटो लीक झाला आहे. याआधी शाहरुख खानने आपल्या बहुप्रतिक्षित 'पठाण' या चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांच्या मनात घर केले होते. शूटिंग सेटवरील लीक झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खानचा माचो लूक पाहायला मिळत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'पठाण'च्या सेटवरून लीक झालेल्या शाहरुख खानच्या फोटोबद्दल सांगायचे तर, यात शाहरुख ऑलिव्ह ग्रीन कार्गो पॅन्ट घालून पोज देताना दिसत आहे. सनग्लासेससह शाहरुख खानच्या शर्टलेस लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या लूकमध्ये शाहरुख खान लांब दाट केसांनी त्याचे टेक्स्चर पूर्ण करत आहे. हा फोटो शाहरुख खानच्या फॅन पेजने शेअर केला आहे. त्याचवेळी किंग खानचा हा फोटो चाहत्यांना 'ओम शांती ओम'मधील 'दर्द-ए-डिस्को' आणि 'मनवा लगे' सारख्या गाण्यांची आठवण करून देतो.
-
#ShahRukhKhan from #Pathaan spain schedule. Epic is the word. pic.twitter.com/DShtiIuFsq
— Indian Box Office (@box_oficeIndian) March 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#ShahRukhKhan from #Pathaan spain schedule. Epic is the word. pic.twitter.com/DShtiIuFsq
— Indian Box Office (@box_oficeIndian) March 15, 2022#ShahRukhKhan from #Pathaan spain schedule. Epic is the word. pic.twitter.com/DShtiIuFsq
— Indian Box Office (@box_oficeIndian) March 15, 2022
याआधी मंगळवारी (१५ मार्च) शाहरुख खानने चाहत्यांना सुखद आनंदाची बातमी दिली होती. त्याने SRK+ हा OTT प्लॅटफॉर्म लाँच करीत असल्याची बातमी चांहत्याना कळवली होती. शाहरुखने ट्विटरवर एक घोषणा पोस्टर शेअर केले, ज्यावर "SRK+, लवकरच येत आहे" असे लिहिले आहे.
सलमानने शाहरुखचे ट्विट शेअर करत अभिनेत्याचे अभिनंदन केले. "आज की पार्टी तेरी तरफ से, शाहरुख. तुझ्या नवीन OTT अॅप, SRK+ साठी अभिनंदन," असे सलमानने म्हटले आहे.
चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी ट्विट केले की तो नवीन OTT अॅपवर सुपरस्टारसोबत सहभागी होत आहे. "स्वप्न पूर्ण झाले! शाहरुखसोबत त्याच्या नवीन OTT अॅप, SRK+ वर सहयोग करत आहे," असे अनुराग कश्यपने कॅप्शन दिले आहे.शाहरुखचा सहकारी आणि मित्र करण जोहरनेही नवीन अॅपबद्दल त्याचे अभिनंदन केले. "वर्षातील सर्वात मोठी बातमी! शाहरुख OTT चा चेहरा बदलणार आहे. खूप उत्साही!!!" असे करणने लिहिले आहे.
शाहरुखने बार्ड ऑफ ब्लड आणि बेताल या दोन वेब सिरीजच्या माध्यामातून शाहरुखने Netflix वर स्ट्रीमिंगचा निर्माता म्हणून डिजिटल स्ट्रीमिंग क्षेत्रात प्रवेश केला होता. या प्रकल्पांना त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचा पाठिंबा होता. 25 जानेवारी 2023 च्या पठाण या आगामी चित्रपटाच्या रिलीजच्या तयारीत शाहरुख बिझी आहे. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आहे.
हेही वाचा - Runway 34 : 'रनवे 34' चित्रपटाचा थरारक टिझर रिलीज