ETV Bharat / sitara

'स्कॅम १९९२' स्टार प्रतीक गांधीसोबत चित्रपटात रोमान्स करणार विद्या बालन - प्रतीक गांधीसोबत चित्रपटात रोमान्स करणार विद्या बालन

'स्कॅम १९९२' या वेब सिरीजचा स्टार असलेला गुजराती अभिनेता प्रतीक गांधी लवकरच अभिनेत्री विद्या बालनसोबत चित्रपटत झळकणार आहे. या चित्रपटाची कथा दोन जोडप्यांची असेल. प्रतीक आणि विद्या या दोघांची निवड जरी झाली असली तरी दुसऱ्या जोडप्याची नावे अद्याप ठरलेली नाहीत.

प्रतीक गांधी विद्या बालन सिनेमा
author img

By

Published : Jun 19, 2021, 7:01 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूबरोबर चित्रपट मिळवल्यानंतर 'स्कॅम १९९२' या वेब सिरीजचा स्टार प्रतीक गांधी बॉलिवूडमधील आणखी एका आघाडीच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करायला तयार आहे. प्रतीकने प्रतिभावंत अभिनेत्री विद्या बालनसोबत चित्रपट साईन केला आहे.

प्रतीक आणि विद्या यांची इलिपिस एंटरटेनमेंटच्या आगामी चित्रपटात कलाकार म्हणून निवड झाली आहे. या चित्रपटाची कथा दोन जोडप्यांची असेल. प्रतीक आणि विद्या या दोघांची निवड जरी झाली असली तरी दुसऱ्या जोडप्याची नावे अद्याप ठरलेली नाहीत.

जाहिरातींच्या जगात ओळखली जाणारी शिर्षा गुहा ठाकुर्ता यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात आव्हानात्मक कथानक असेल. शिर्षा यांनी राम गोपाल वर्मा दिग्दर्शित रण, फुंक आणि कॉन्ट्रॅक्ट यासारख्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर शिर्षा दिग्दर्शकिय पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय.

गंमतीची बाब म्हणजे विद्याबरोबर काम करण्यापूर्वी, प्रतीकने यापूर्वीच तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर एक चित्रपट साइन केला आहे. वो लाडकी है कहाँ या सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या चित्रपटात तापसी पन्नू काम करीत आहे. अरशद सय्यद दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी शुटिंग फ्लोअरवर जाईल.

दरम्यान, अभिनेता प्रतीक हा हार्दिक गज्जरच्या 'अतीथी भूत भवा' या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि शर्मिन सेगल याच्यासह नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता प्रतिकला 'विठ्ठल तेडी' या गुजराती वेब सीरिजमध्ये शेवटच्या वेळी पाहिले होते.

विद्या बालनचा 'शेरनी' हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालाय. न्यूटनचे दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्या या चित्रपटात विद्याने एका वनअधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे जी नरभक्षक वाघिणीच्या शोधात आहे.

हेही वाचा - RIP Milkha Singh: मिल्खा सिंगच्या निधनाने फरहान अख्तर भावूक, बॉलिवूड सेलेब्रिटीजनी वाहीली श्रध्दांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.