मुंबई - सैफ अली खानची दुसरी पत्नी करिना कपूर आणि पहिल्या पत्नीची मुलगी सारा अली खान यांच्याच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इतकंच नाही तर सारा करिनाची मोठी चाहतीदेखील आहे. नुकतंच एका मुलाखतीत सारानं करिनासोबतच्या नात्याबद्दल बातचीत केली.
सारा म्हणाली, आमच्या नात्यात मैत्री आणि सन्मान दोन्ही आहे. करिना कपूर माझी चांगली मैत्रीण आहे. मात्र, यापेक्षाही जास्त ती माझ्या वडिलांची पत्नी आहे. मला असं वाटतं, की ती माझ्या वडिलांना आनंदी ठेवते. आम्ही दोघीही एकाच क्षेत्रात काम करतो.
सारा सैफची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफ आणि अमृतानं २००४ साली तलाक घेतला. तर २०१२ मध्ये सैफनं करिनासोबत लग्नगाठ बांधली. सैफ आणि अमृताला सारा अन् इब्राहिम ही दोन मुलं आहेत. तर करिना आणि सैफला तैमूर अली खान हा मुलगा आहे.