मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमी काही ना काही कारणामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत राहते. तिच्या बऱ्याच फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते. मात्र, अलीकडेच तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचा भाऊ इब्राहिम खानसोबत तिने बिकनीवरील फोटो पोस्ट केल्यामुळे ती ट्रोल झाली आहे.
इब्राहिम खानचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त साराने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे मालदिव येथील फोटो शेअर केले आहेत. मात्र, नेटकऱ्यांना साराने अशाप्रकारचा फोटो शेअर करुन शुभेच्छा देणं फारसं रुचलेलं नाही. तुझ्याकडून अशाप्रकारची अपेक्षा नाही, तू असे फोटो शेअर करणं शोभत नाही, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा- टॉलिवूड ते बॉलिवूड, 'या' रिक्रियेटेड भूमिकांनी गाजवलं बॉक्स ऑफिस
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सारा काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आज कल २' या चित्रपटात दिसली. आता ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाशिवाय ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -'हा' चिमुकला आज आहे बॉलिवूडचा अॅक्शन हिरो, ओळखा पाहू कोण ?