मुंबई - बॉलिवूडमधील काही जोड्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. यात रणबीर-आलिया, वरूण-नताशा यांच्यासह सारा आणि कार्तिक आर्यनचाही समावेश आहे. लवकरच कार्तिक आणि साराची जोडी इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गेल्या काही दिवसांपासून ही जोडी अनेकदा एकत्र स्पॉटही झाली आहे. गुरूवारीही मुंबई एअरपोर्टवर या कपलला स्पॉट केलं गेलं. मात्र, हे कपल नेमकं कुठे जात आहे, हे समजू शकलं नव्हतं. अशात आता या जोडीला शिमलाच्या रस्त्यांवर फिरताना स्पॉट केलं गेलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या फोटोंमध्ये साराने आपला चेहरा ओढणीने झाकला आहे. तर कार्तिकनेही आपला चेहरा झाकला आहे. नेहमीप्रमाणेच या फोटोतही सारा पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. इम्तियाज अलीच्या चित्रपटाच्या दिल्ली आणि मुंबईतील शेड्यूलनंतर आता ही जोडी चित्रीकरणासाठी शिमलाला पोहोचली आहे.