ETV Bharat / sitara

'या' खास दिवशी संजू बाबा प्रदर्शित करणार 'प्रस्थानम'चा टीझर

काही दिवसांपूर्वीच संजयने या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं होतं. जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या चित्रपटात संजयशिवाय मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अमायरा दस्तूर आणि अली फजल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत

संजय दत्त
author img

By

Published : Jul 27, 2019, 5:25 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'प्रस्थानम' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. संजय दत्त या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 'प्रस्थानम' नावाच्याच हीट तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे.

देवा कट्टा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून तेलुगू सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. आता या चित्रपटाबद्दलचं एक वृत्त समोर आलं आहे. या सिनेमाचा टीझर २९ जुलैला म्हणजेच संजू बाबाच्या वाढदिवशी प्रदर्शित केला जाणार असल्याचे म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच संजयने या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं होतं. जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या चित्रपटात संजयशिवाय मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अमायरा दस्तूर आणि अली फजल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. सिनेमा येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात आता प्रेक्षक सिनेमाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.