ETV Bharat / sitara

रासपमधील प्रवेशावर संजय दत्तची प्रतिक्रिया, म्हणाला... - रासप वर्धापनदिन

संजय राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. इतकंच नव्हे तर स्वतः रासपचे अध्यक्ष, मंत्री महादेव जानकर यांनीदेखील याबद्दलची माहिती दिली होती.

रासपमधील प्रवेशावर संजय दत्तची प्रतिक्रिया
author img

By

Published : Aug 26, 2019, 6:15 PM IST

मुंबई - अभिनेता संजय दत्त लवकरच राजकारणात सक्रीय होणार असून तो राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. इतकंच नव्हे तर स्वतः रासपचे अध्यक्ष, मंत्री महादेव जानकर यांनीदेखील याबद्दलची माहिती दिली होती. मात्र, आता संजू बाबानं हे वृत्त फेटाळलं आहे.

मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. जानकर हे माझे चांगले मित्र आहेत. भविष्यातील त्यांच्या कामांसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असं संजयनं म्हटलं आहे. संजय दत्तने एक व्हिडिओ शेअर करुन रासपच्या वर्धापनदिनानिमित्त महादेव जानकरांना शुभेच्छा दिल्या होत्या, यानंतर त्याच्या रासप प्रवेशाबद्दलचे तर्क लावण्यात येत होते.

  • Sanjay Dutt on reports of him joining Rashtriya Samaj Paksha ahead of assembly elections: I will not be joining any party. Mr Jankar (Maharashtra minister&RSP chief Mahadev Jankar) is a dear friend & brother of mine and I humbly wish him good luck for his future endeavours. pic.twitter.com/W9DVQHdsIK

    — ANI (@ANI) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनीदेखील राष्ट्रीय समाज पक्षात तो प्रवेश करणार असल्याची माहिती मुंबईत आयोजित पक्षाच्या महामेळाव्यात दिली होती. २५ सप्टेंबर रोजी संजय दत्तचा 'रासप' मध्ये प्रवेश होणार असल्याचे जानकर यांनी म्हटले होते. मात्र, या प्रवेशाचं वृत्त संजू बाबानं फेटाळलं आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.