ETV Bharat / sitara

'संदिप और पिंकी फरार' ट्रेलरमध्ये दिसली सनसनाटी नाट्याची झलक

'संदिप और पिंकी फरार' चित्रपटाच्या निर्मात्यांनी अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या व्यक्तीरेखांचे पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर एक दिवसातच ट्रेलर रिलीज केला आहे. दिबाकर बॅनर्जीच्या 'इश्कजादे'ची ही लोकप्रिय जोडी तिसऱ्यांदा एकत्र काम करीत आहे.

author img

By

Published : Mar 4, 2020, 6:13 PM IST

Sandip Aur Pinky Farar
'संदिप और पिंकी फरार

मुंबई - 'संदिप और पिंकी फरार' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर नाट्य पाहायला मिळत आहे. अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकात आहेत.

रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये दिबाकर बॅनर्जींच्या थ्रीलर वर्ल्डची झलक पाहायला मिळते. यात परिणीती चोप्रा संदिप कौर ही भूमिका साकारत आहे. दिल्लीतून पळून जाण्यासाठी ती अर्जुन कपूरची म्हणजेच पिंकी दहियाची मदत घेते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'संदिप और पिंकी फरार' चित्रपटात अर्जुन कपर अंडरकव्हर कॉपची भूमिका करत आहे. तर आपली ओळख लपवण्यासाठी परिणीती कार्पोरेटमध्ये काम करत असल्याचे नाटक करते. चित्रपटामध्ये किती थरार आहे याची एक झलक आपल्याला २ मिनीटे २७ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा यांच्याशिवाय चित्रपटात अर्चना पुरण सिंग, संजय मिश्रा, नीना गुप्ता आणि पंकज त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. २० मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.