मुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नुकताच तिने जिम करतानाचा आपला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आपल्या घरातील जिममध्येच समंथा मेहनत घेत आहे. जोपर्यंत बाहेरुन पूर्णपणे गरम होत नाही, तोपर्यंत आम्ही जिम करतो. केवळ 60 सेकंदात आम्ही हे करत असल्याचे म्हणत समंथाने आपली व्यायाम करण्याची पद्धत नेटकऱ्यांना सांगितली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
समंथा तिच्या सोशल मीडियावरील मजेशीर पोस्टसाठी ओळखली जाते. शुक्रवारी तिने पती नागा चैतन्यचा एक फोटो शेअर केला. यात त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्राऊन पॅन्ट घातली होती. याला समंथाने कॅप्शनही दिले होते. आई, बहिणी, मित्र-मैत्रिणी आणि इतर अनेकांनंतर आता हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. माझा नवरा यात किती हँडसम दिसतोय ना. हे वाचल्यावर तो नक्कीच उडी मारण्यासाठी एक मोठा खड्डा खोदत असेल, असे मजेशीर कॅप्शन तिने दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नुकतंच नागा चैतन्य आणि समंथा राणा दग्गूबती आणि मीहिका यांच्या रोका समारंभात सहभागी झाले होते. या सोहळ्यातील एक फोटो शेअर करत 2020 मधील सर्वात आनंदाची बातमी दिल्याबद्दल तिने राणा आणि मीहिकाचे आभार मानले होते. समंथाने अनेक तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.