मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट ईदला रिलीज झाला. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाने इतिहास रचला आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी प्लॅटफॉर्मवर ४.२ दशलक्ष व्यूव्ह्जने सर्वाधिक पाहिलेला चित्रपट बनला आहे. आयएमडीबी रेटिंग व्यासपीठावर मात्र सलमानला सर्वात वाईट रेटिंग मिळाले आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊ शकला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पे-पर-व्ह्यूद्वारे आणि आघाडीच्या डीटीएच ऑपरेटरद्वारे हा चित्रपट देशातील चाहत्यांपर्यंत पोहोचला. हा चित्रपट ४० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्यात प्रमुख परदेशी मार्केटचाही समावेश आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शुक्रवारी बिझिनेस अपडेट शेअर करत सलमान खान फिल्म्सच्या सोशल मीडिया हँडल्सने चित्रपटाचे खास पोस्टर शेअर केले असून असा दावा केला आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोडले आहे आणि हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४. २ दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे.
दरम्यान, सलमान खानच्या ईद २०२१ च्या रिलीजने आयएमडीबीवर अभिनेत्याचे दुसरे सर्वात वाईट रेटिंग नोंदवले आहे.
भारतात अजूनही कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नसल्यामुळे हा चित्रपट पे- पर -व्ह्यू- रिलीजच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतल्या सलमानने अगदी स्पष्टपणे कबूल केले होते की रिलीजनंतर चित्रपटाने कमाई करण्याच्या बाबतीत त्याला फारशी आशा नाही.
प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या सणानिमित्य १३ मेपासून ओटीटी आणि डीटीएच सेवांसह अनेक प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या राधे पे-पर-व्ह्यू ब्रॉडकास्ट झी प्लेक्सवर प्रदर्शित झालाय.
हेही वाचा - राधे' चित्रपटातून कमाई होणार नसल्याचे सलमानने केले कबुल