मुंबई - आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. या जनता कर्फ्यू दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कलाविश्वातील सेलेब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. अभिनेता सलमान खाननेही एका व्हिडिओद्वारे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या बरेच कलाकार घरी बसून सेल्फ आयसोलेशनमध्ये राहत आहेत. अनेक चित्रपटांचे शूटिंग पुढे ढकलल्यामुळे कलाकार आपल्या कुटुंबीयासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. सलमान खान देखील मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करत आहे. त्याच्या भाच्यासोबत बागेत जाऊन वेळ घालवत आहे. तसेच आपल्या चित्रकलेच्या छंदालाही तो वेळ देत आहे.
हेही वाचा -खेळायला जाण्यासाठी हट्ट करणारा 'चैत्या' देखील पाळणार 'जनता कर्फ्यू'
त्याने व्हिडिओ शेअर करून नागरिकांना देखील काही दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, ही खूप गंभीर परिस्थिती आहे. मास्कचा वापर करा. हात स्वच्छ धुवा, तसेच स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन त्याने केले आहे.
-
#IndiaFightsCorona @CMOMaharashtra @mybmc @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/l9qPAPs88U
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#IndiaFightsCorona @CMOMaharashtra @mybmc @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/l9qPAPs88U
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2020#IndiaFightsCorona @CMOMaharashtra @mybmc @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/l9qPAPs88U
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2020
जनता कर्फ्यूचा हा दिवस म्हणजे सार्वजानिक सूट्टी नाही. त्यामुळे घरीच बसून राहा, असेही त्याने म्हटले आहे.
कोरोनामुळे टीव्हीवरील अनेक कार्यक्रमाचे शूटिंग लांबल्यामुळे सलमान खानचा बिग बॉस १३ हा कार्यक्रम टीव्हीवर पुन्हा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे घरी बसून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
हेही वाचा -COVID 19 : पंतप्रधान मोदींनी शेअर केला कार्तिक आर्यनचा 'कोरोना' व्हिडिओ