मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडध्ये ३० वर्ष पूर्ण झाली. अशात आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान बोलताना सलमानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. माझे चित्रपट हीट होवो किंवा फ्लॉप, चाहते नेहमीच माझ्यासोबत असतात, असा विश्वास सलमानने व्यक्त केला.
सलमान म्हणाला, मैने प्यार कियापासून आजपर्यंत चाहत्यांसोबत माझं एक खास नातं आहे. आजपर्यंत चाहत्यांनी मला सल्लू, सल्ले, भाई आणि भाईजानसारखी अनेक नावे दिली. हे मिळवण्यासाठीचा प्रवास खूप मोठा होता. माझ्या या प्रगतीनं मी आनंदी असून चाहत्यांच्या या प्रेमासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो.
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, सलमान खान लवकरच दबंग ३ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभूदेवा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. याशिवाय भाईजान किक २ सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २०२० ला ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.