बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा सलमान खान सध्या 'अंतिम' चित्रपटामध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या 'अंतिम' या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आली होती. त्या वेळी, सलमानच्या फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले होते. स्क्रिनिंगमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचबरोबर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माही यात सामील झाला होता.
या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेला पाहून सलमान आदरार्थी नतमस्तक होतो. त्याचा हा नम्रपणा पाहून ती महिला आशीर्वादासाठी सलमानच्या डोक्यावर हात ठेवते. त्याचवेळी, यानंतर सलमान तिचा हात पकडून तिचेयासोबत फोटो एकत्र क्लिक करतो. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल बनत असून, त्यावर अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत.
हा व्हिडिओ खरच भावूक असल्याचे एकाने म्हटलंय. या व्हिडिओवर कमेंट करताना सलमानच्या एका चाहत्याने लिहिले आहे- 'भाईला स्टार असल्याचा गर्व नाही. म्हणूनच प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो."
त्याचबरोबर अनेकांनी हार्ट इमोजी बनवून सलमानच्या या स्टाइलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यादरम्यान सलमानने काही मुलांसोबत क्लिक केलेले फोटोही पाहायला मिळाले. शेवटच्या स्क्रिनिंगमध्ये सलमान त्याच्या अंगरक्षक शेरासोबत होता, तर त्याची बहीण अलविरा पती अतुल अग्निहोत्रीसोबत आली होती. यासोबत अर्पिता, आयुष, अरबाज, जॉर्जिया, आयुष शर्माचे आई-वडील, युलिया वंतूर, दिशा पटानी, सुनील शेट्टी यांच्यासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
हेही वाचा - मी शीख समाजाचा आब राखत भूमिका साकारली, ‘सरदार इज किंग’ म्हणाला सलमान खान