ETV Bharat / sitara

'छिछोरे'च्या यशानंतर साजिद नाडियाडवाला अन् नितेश तिवारी पुन्हा एकत्र

author img

By

Published : Sep 11, 2019, 2:26 PM IST

छिछोरेला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर आता नितेश आणि साजिद यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. आता ही जोडी कोणती नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

साजिद नाडियाडवाला अन् नितेश तिवारी पुन्हा एकत्र

मुंबई - नितेश तिवारीद्वारा दिग्दर्शित 'छिछोरे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. साजिद नाडियाडवाला यांनी या सिमेमाची निर्मिती केली आहे. छिछोरेला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर आता नितेश आणि साजिद यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. छिछोरेच्या यशानंतर साजिद आणि नितेश प्रेक्षकांना आणखी एक नवी कथा सांगण्यासाठी सज्ज झाले असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. यासोबतच दोघांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

'छिछोरे'बद्दल बोलायचं झाल्यास, हा सिनेमा कॉलेज जीवनातील मैत्रीवर आधारित आहे. प्रदर्शनानंतर ४ दिवसात या चित्रपटाने ४४.०८ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता ही जोडी कोणती नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.