ETV Bharat / sitara

सायरा बानू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुन्हा अँजिओग्राफीसाठी दाखल करणार

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते.

Saira Banu Discharged From Hospital
सायरा बानू
author img

By

Published : Sep 6, 2021, 10:40 AM IST

Updated : Sep 6, 2021, 12:17 PM IST

मुंबई - दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांना प्रकृती बिघडल्यामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती सुधारल्यानंतर सायरा बानू यांना काल रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुन्हा अँजिओग्राफीसाठी दाखल करणार -

सायरा बानू नैराश्याने ग्रस्त नाहीत. तसेच त्यांनी अँजिओग्राफी करण्यासही नकार दिला नाही. अँजिओग्राफी काही दिवसांनी केली जाईल. सर्वप्रथम त्यांच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवावे लागेल. सध्या सायरा बानू यांची प्रकृती सुधारली आहे. मात्र, त्यांना पुन्हा अँजिओग्राफीसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. ही माहिती डॉक्टर नितीन गोखले यांनी दिली आहे. अँजिओग्राफीसाठी सायरा यांनी डॉक्टरांना नकार दिल्याचं म्हटलं जात होतं.

54 वर्ष एकत्र -

हिंदी सिनेसृष्टीचे 'किंग ऑफ ट्रेजेडी' दिलीप कुमार उर्फ युसूफ खान आणि सायरा बानू यांचे प्रेम कोणत्याही परिकथेपेक्षा कमी नाही. 22 वर्षीय अभिनेत्री सायरासोबत दिलीप कुमार विवाहबद्ध झाले. यावेळी दिलीप कुमार यांचे वय 44 वर्षे इतके होते. 11 ऑक्टोबर 1966 रोजी सायरा बानू आणि दिलीप कुमार यांचा विवाह झाला होता. ते 54 वर्षे एकत्र होते. वयाच्या 98 व्या वर्षी दिलीप कुमार यांचे निधन झाले. सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा साभाळ केला आणि त्यांना साथ दिली.

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी

हेही वाचा - VIDEO : एका पर्वाचा अस्त; महानायक दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

Last Updated : Sep 6, 2021, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.