ETV Bharat / sitara

सैफ अली घेणार 'पॅटर्निटी ब्रेक' : बाळाच्या आगमनावेळी कोण काम करेल का? - सैफ अली खान पॅटर्निटी ब्रेक घेणार

सैफ अली खान पुन्हा एकदा बाप होण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या नव्या बाळाच्या आगमनासाठी तो पॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचे त्याने म्हटलंय.

Saif Ali Khan on paternity break
सैफ अली घेणार 'पॅटर्निटी ब्रेक'
author img

By

Published : Feb 8, 2021, 12:34 PM IST

मुंबई - अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा बाप होण्यासाठी सज्ज झाला आहे. या महिन्यात करिना कपूर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. आपल्या नव्या बाळाच्या आगमनासाठी तो पॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचे त्याने म्हटलंय. त्यानंतर तो आदिपुरुष चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करेल.

सैफने अलिकडेच एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य केले. तो म्हणाला, ''जेव्हा तुमच्या घरी नवजात बाळाचे आगमन होणार असते तेव्हा काम करायची कोणाला इच्छा असते? तुमच्या मुलांचे संगोपन तुम्ही पाहात नसाल तर तुम्ही चूक करीत असता. मी कामातून विश्रांती घेत आहे, ही खास परिस्थिती आहे. ९ ते ५ असे रुटीन फॉलो करण्याऐवजी मी कलाकारासारखे वागतो. तुमचा धर्म आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्या करियरवर आधारित असतो.''

सैफ आणि करीना, त्यांचे चाहते सैफिना म्हणून ओळखतात. २०१२ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना तैमूर नावाचा एक मुलगा देखील आहे. अभिनेत्री अमृता सिंगसोबतच्या पहिल्या लग्नापासून सैफला इब्राहिम आणि सारा अली खान ही दोन अपत्ये आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या आगामी चित्रपटात सैफ अली महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिज यांच्या भूमिका असलेल्या हॉरर-कॉमेडी 'भूत पोलिस' चित्रपटातही तो दिसणार आहे.

हेही वाचा - वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या करणची यश आणि रुहीने घेतली मजा; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.