मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकरने आगामी ‘मिमी’ या डिजिटल चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयीचा खुलासा केला आहे. पंकज त्रिपाठी आणि कृती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सई एका छोट्या शहरातील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी बोलताना सई म्हणाली की, “मीमी चित्रपटातील माझी भूमिका एका अशा मुलीची आहे जी आपल्या मैत्रिणीसाठी रुढीवादी समाजाला आव्हान देते. मी प्रामाणिकपणे अशी भूमिका साकारत आहे ती आपल्या आयुष्यात पूर्ण अनुभव देणारी आहे.''
-
#Mimi expected everything, except for this unexpected journey! 😉
— Sai (@SaieTamhankar) July 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch the glimpse of her unexpected story with your family. #MimiTrailer out now: https://t.co/acwqneA8iF
Releasing on 30th July on @JioCinema & @NetflixIndia. #NothingLikeWhatYoureExpecting@kritisanon
">#Mimi expected everything, except for this unexpected journey! 😉
— Sai (@SaieTamhankar) July 13, 2021
Watch the glimpse of her unexpected story with your family. #MimiTrailer out now: https://t.co/acwqneA8iF
Releasing on 30th July on @JioCinema & @NetflixIndia. #NothingLikeWhatYoureExpecting@kritisanon#Mimi expected everything, except for this unexpected journey! 😉
— Sai (@SaieTamhankar) July 13, 2021
Watch the glimpse of her unexpected story with your family. #MimiTrailer out now: https://t.co/acwqneA8iF
Releasing on 30th July on @JioCinema & @NetflixIndia. #NothingLikeWhatYoureExpecting@kritisanon
सई ताम्हणकर पुढे म्हणते, ''असे चित्रपट केवळ मनोरंजन करीत नाहीत तर जीवनाचे सार आणि जगण्याच्या पध्दतींचे प्रदर्शन करतात. अभिनेत्री म्हणून काम केल्यामुळे मला माझ्या पात्रांमधून नवीन आयुष्य जगण्याचे पुरेसे स्वातंत्र्य मिळते. मी एक व्यक्ति म्हणून आव्हान देणारी आणि माझ्या पलीकडे जाणाऱ्या वर्णांची जाणीवपूर्वक निवड करण्याचा प्रयत्न केला आहे.''
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आगामी कॉमेडी-ड्रामा असलेल्या मिमी या चित्रपटात सरोगेट मदर बनलेल्या युवतीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिला समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागतो.
30 जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचे निधन, मराठीसह या ५ भाषांमधील ५०० चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा