मुंबई - साहो सिनेमाचे दिग्दर्शक सुजित यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका छोट्याशा लघुपटापासून बिग बजेट साहो सिनेमापर्यंतचा आपला प्रवास सांगितला आहे. त्यांची ही भावनिक पोस्ट सर्वांसाठीचं जिद्दीची एक उत्तम उदाहरण आहे.
हेही वाचा - चित्रपटातील भूमिकेसाठी ताहीर राज भसीनने ओढल्या तब्बल २०० पाकिटे सिगारेट!
सुजितनं पोस्टमध्ये म्हटलं, १७ वर्षांचा असताना आयुष्यात पहिल्यांदा एका लघुपटाची निर्मिती केली. यावेळी माझ्याकडे ना टीम होती ना पैसे, मात्र कुटुंबाकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला. मी स्वतःच ही फिल्म एडिट केली, चित्रीत केली आणि तिचं दिग्दर्शनही केलं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
माझ्या चुकांमधूनच मी शिकत गेलो आणि स्वतःत बदल घडवत गेल्यामुळे माझा प्रवास अधिक जलद झाला. हा खूप मोठा प्रवास होता आणि या प्रवासादरम्यान अनेक अडथळे आले, मात्र केव्हाही हा प्रवास थांबवला नाही. आज अनेक लोक साहो सिनेमा पाहात आहेत. काहींना या सिनेमाकडून जास्त अपेक्षा होत्या, तर अनेकांना हा सिनेमा आवडला. हा सिनेमा पाहण्यासाठी सर्वांचे आभार. चित्रपटातील काही भाग पाहणं राहून गेलं असेल, तर चित्रपट पुन्हा पाहा. तुम्ही आधीपेक्षा जास्त तो एन्जॉय कराल, याची मला खात्री आहे, असं सुजितनं म्हटलं आहे.
हेही वाचा - Making Video: चॉकलेट बॉयपासून ड्रीम गर्ल बनण्यासाठी आयुष्मानला घ्यावी लागली प्रचंड मेहनत