मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला साहो सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. २ आठवड्यात या सिनेमाने ४०० कोटींचा गल्ला पार केला आहे.
हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ४२४ कोटींचा गल्ला पार केला आहे. हा सिनेमा ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे. चित्रपटाचं बजेट आणि कलाकारांची लोकप्रियता पाहता, ही कमाई काहीशी कमीच आहे.
-
From Unstoppable to now Unbeatable!!! #SAAHO has set the BO on fire!🔥
— UV Creations (@UV_Creations) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Collects 424Cr+ in 2 weeks worldwide 💥💥💥
Book tickets here : https://t.co/3g8zydBuXu #SaahoInCinemas pic.twitter.com/yyMcW1HPH5
">From Unstoppable to now Unbeatable!!! #SAAHO has set the BO on fire!🔥
— UV Creations (@UV_Creations) September 13, 2019
Collects 424Cr+ in 2 weeks worldwide 💥💥💥
Book tickets here : https://t.co/3g8zydBuXu #SaahoInCinemas pic.twitter.com/yyMcW1HPH5From Unstoppable to now Unbeatable!!! #SAAHO has set the BO on fire!🔥
— UV Creations (@UV_Creations) September 13, 2019
Collects 424Cr+ in 2 weeks worldwide 💥💥💥
Book tickets here : https://t.co/3g8zydBuXu #SaahoInCinemas pic.twitter.com/yyMcW1HPH5
सुजित यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रभासने तब्बल दोन वर्ष दिली. तर श्रद्धा कपूरने यानिमित्ताने पहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम केलं आहे. आता हा सिनेमा आणखी किती कमाई करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.