ETV Bharat / sitara

'आरआरआर' Vs 'मैदान': राजामौलींना रिलीजसाठी हॉलिडे रिलीज वगैरेची गरज नाही - बोनी कपूर - निर्माता बोनी कपूर

'आरआरआर' आणि 'मैदान' या दोन बिग बजेट चित्रपटाचे रिलीज एकाच दिवशी होणार आहे. दोन्ही चित्रपट १३ ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. २०२० मध्ये मोठा फटका बसलेल्या फिल्म इंडस्ट्रीला या रिलीजमुळे तोटा होऊ शकतो. आता दोन्ही निर्माते यावर काही तोडगा शोधणार का हे यापुढे पाहावे लागणार आहे.

RRR Vs Maidaan
'आरआरआर' Vs 'मैदान'
author img

By

Published : Feb 13, 2021, 6:04 PM IST

हैदराबाद - 'मैदान' या चित्रपटाची रिलीज तारीख बदलण्याच्या मुडमध्ये निर्माता बोनी कपूर दिसत नाहीत. 'आरआरआर' चित्रपटाची आणि 'मैदान'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असल्यामुळे बोनी कपूर यांनी एस एस राजामौली यांची भेट घेतली मात्र त्यांना औपचारिक उत्तर मिळाले आहे. बोनी कपूर म्हणाले की राजामौलींना रिलीजसाठी हॉलिडे रिलीज वगैरे किंवा सामर्थ्यवान युक्तीचा अवलंब करण्याची गरज नाही.

'आरआरआर' आणि 'मैदान' चित्रपट यांच्यात रिलीजबाबत समझोता होऊ न शकल्याचे कारण वेगळेच असल्याची सध्या इंडस्ट्रीत कुजबुज आहे. 'बाहुबली' या चित्रपटात श्रीदेवीने काम करावी अशी राजामौलीची इच्छा होती. मात्र त्यावेळी 'बाहुबली'सोबतच तामिळमध्ये बनत असलेल्या 'पुली' या चित्रपटात काम करण्यास श्रीदेवीने प्राधन्य दिले आणि 'बाहुबली' नाकारला होता. त्यावेळी श्रीदेवीला ऑफर झालेली भूमिका रम्या कृष्णनने केली होती.

या अफवांमध्ये किती तथ्य आहे याबद्दल बोनी कपूरला विचारले असता ते म्हणाले, "राजामौलीने जेव्हा तिला भूमिकेची ऑफर दिली होती तेव्हा श्रीदेवीने 'बाहुबली'मध्ये भूमिका साकारली नव्हती. त्यांच्यात याबद्दल काही गैरसमज निर्माण झाले असावेत पण राजामौलीला बहुतेक कारण दिले गेले होते याची पुष्टी मी देखील करू शकतो. राजामौली यांच्याबद्दल चित्रपट निर्माता म्हणून मला खूप आदर आहे आणि त्यांनी बाहुबलीसारखा चित्रपट बनवला असल्यामुळे त्यांना रिलीजसाठी हॉलिडे रिलीज वगैरे किंवा सामर्थ्यवान युक्तीचा अवलंब करण्याची गरज नाही.''

'आरआरआर'मध्ये राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहेत. ४५० कोटी रुपयांच्या बजेटवर बनत असलेला हा चित्रपट तेलुगु, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर 'मैदान' हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांचा बायोपिक आहे. अजय देवगण याची भूमिका असलेला हा चित्रपट अमित शर्मा दिग्दर्शित असून हिंदी, तमिळ, तेलगु आणि मल्याळम भाषांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला ‘गर्लफ्रेंड’ भेटायला येतेय शेमारू मराठीबाणावर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.